Home पंढरपूर बोहाळीत एकाच दिवशी सहा रुग्ण. आज ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली. घोंगडे...

बोहाळीत एकाच दिवशी सहा रुग्ण. आज ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली. घोंगडे गल्लीला दिलासा नाही.

1141
0

पंढरपूर:- पंढरपूर मध्ये आज नव्या 33 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. पंढरपूर तालुक्याचे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 453 वर पोहोचली. आज 45 कोरोना बाधित रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोना वर मात केली. आज बाधित रूग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.
पंढरपूर मध्ये आज पर्यंत 3246 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये 3051 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर अद्याप 195 अहवाल हे प्रलंबित आहेत. तर 2598 अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित 453 अहवाल हे कोरोना पॉझिटिव रुग्णांचे आहेत.
आज सापडलेले कोरोना बाधित रुग्ण हे फुलचिंचोली,भटुंबरे, सरकोली, नेपतगाव शिरभावी, नारायण चिंचोली, बोहाळी
तुंगत, करोळे आणि शिंदे वस्ती अकोले बुद्रुक माढा तालुक्यातील असे 18 रुग्ण आहेत. बोहाळीत सर्वाधिक सहा रुग्ण सापडले आहेत.
तर पंढरपूर शहरांमध्ये एकूण १५ रुग्ण आढळले आहेत. चंद्रभागा घाट, परदेशी नगर, कवठेकर गल्ली, घोंगडे गल्ली, महाद्वार शॉपिंग सेंटर कवठेकर दुकाना शेजारी, बंकट स्वामी मठ, मनिषा नगर, तिरंगा नगर, शितल शहा हॉस्पिटल जवळ, काळा मारुती जवळ आणि सावतामाळी मंदिराजवळ असे शहरात रुग्ण आढळून आलेले आहेत.

पंढरपूर मध्ये आज पर्यंत 192 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. आज पर्यंत नऊ कोरोना बाधित रुग्णांचा पंढरपुरात मृत्यू झालाय.