पंढरपूर:- पंढरपुरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. शहर आणि तालुक्यात मिळून 12 तासांमध्ये तब्बल 55 कोरणा बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची त्याचबरोबर पंढरपूर करांची चिंता वाढलीय. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरूना बाधित यांची संख्या आता 508 वर पोहोचलीय.
आज रामबाग परिसरामध्ये सर्वात जास्त म्हणजे बावीस कोरूना बाधित रुग्ण आढळून आलेत. गांधी रोडचा कोरोनाचा विळखा अद्याप सुटलेला नाही. आज देखील गांधी रोड परिसरामध्ये २ कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. कडबे गल्ली परिसरात तीन रुग्ण नव्याने सापडलेत. झेंडे गल्ली 6, घोंगडे गल्ली 4 , जुनी पेठ 4, बंकट स्वामी मठ 5 , संत पेठ 2, पद्मावती झोपडपट्टी 1 , दाळी 1 , डोंबे गल्ली 1, तानाजी चौक 1, गोविंदपुरा 1, इंदिरा गांधी भाजी मार्केट 1, लक्ष्मी टाकळी 1 असे एकूण 55 कोरोना बाधित रुग्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यांमध्ये आढळून आलेत.