Home पंढरपूर पंढरपूर जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव.

पंढरपूर जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव.

685
0

पंढरपूर :- पंढरपूर सबजेल मधील चार आरोपींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. या चारही आरोपींना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये या चार जणांना बाधा झालीय.
पंढरपूर सब जेल मध्ये एकूण 50 कैदी आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अनैसर्गिक कृत्य असे आरोप असलेल्या चार कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. या चारही आरोपींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच उर्वरित ४६ कैद्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पंढरपूर शहर आणि तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. आता सब जेल मधील कैद्यांना बाधा झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली.