Home पंढरपूर पंढरपूरकरांना आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन करु देण्याची मागणी .

पंढरपूरकरांना आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन करु देण्याची मागणी .

294
0

पंढरपूर :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. १ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा आहे. मात्र प्रशासनाने मंदिर बंद असल्याने भाविकांना पंढरपूरात येण्यास मज्जव केलाय. तसेच मानाच्या पालख्या देखिल हेलीकॉप्टरने येणार आहेत.


त्यामुळे मंदिर समितीने पंढरपूरातील स्थानिक नागरिकांना आषाढी एकादशी दिवशी दर्शनाचा लाभ द्यावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आलीय. मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी ही मागणी केलीय. यासाठी मनसेच्या वतीने थर्मल स्क्रिनिंग मशीन, मास्क , सॅनिटायझर आणि हॅंडग्लोज पुरविण्याची जबाबदारी मनसेने घेतली आहे.
तसेच तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरचे मंदिर सर्वांसाठी खुले करावे अशी देखिल मागणी केलीय.