Home पंढरपूर आ. भारत नाना भालके आणि नागेश काका भोसलेंची इसबावीत भेट!

आ. भारत नाना भालके आणि नागेश काका भोसलेंची इसबावीत भेट!

2563
0

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत नाना भालके आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसलेंची आज इसबावी परिसरात एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने समाजसेवक विष्णू शेटे आणि जेष्ठ नागरिक बाळासाहेब मलपेंच्या घरी त्यांनी भेटी दिल्या.
सध्या राजकीय वातावरणात या दोघांची भेट झाल्याने शहरात चर्चेचे पेव फुटले आहे.


आज शिवराज्याभिषेक दिन पंढरीत साजरा करण्यात आला. आ. भारत नाना भालके आणि नागेश काका भोसलेंनी छत्रपतींच्या पुतळ्याला दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात अभिवादन केले. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने इसबावी येथे समाजसेवक विष्णू शेटेंच्या घरी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन ठेवण्यात आले होते. आ. भारत नाना भालके आणि नागेश काका भोसले हे दोघेही या कार्यक्रमाला एकत्र होते. त्यानंतर आ. भारत भालकेंनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब मलपेंची त्यांच्या घरी जावून सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले देखिल उपस्थित होते. आ.भालके आणि भोसले यांनी मलपेंच्या प्रकृती बद्दल आस्थेने चौकशी केली.
आ.भारत नाना भालके आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले इसबावी परिसरात एकत्र दिसल्याने एकच चर्चा सुरु झाली.
सध्या पंढरपूरचे राजकीय वातावरण कमालीचे बदलत आहे. नगरपालिकेच्या सभेत आ. भालके समर्थक आणि सत्ताधारी गटाच्या काही नगरसेवकांनी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, पक्षनेते यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप केले होते. त्याचे पडसाद सोशल मिडियावर उमटले. भोसले समर्थकांनी I Support Nagesh Kaka हा ट्रेंड सुरु केला. याला आ.भालके समर्थकांनी मोठ्याप्रमाणात उचलून धरले. तर दुसरीकडे पक्षनेत्यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा सुरु झाली. आतातर उपनगराध्यक्ष तथा भाजपचे गटनेते देखिल सत्ताधारी पार्टीच्या रडारवर असल्याची चर्चा सुरुये.

अशा वातावरणात विधानसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणारे शहर विकास आघाडीचे नेते जास्तच गोंधळून गेलेले दिसत आहेत. तर सत्ताधारी आघाडीतील अनेक नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नाराज आहेत. दीड वर्षावर आलेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीपुर्वीची ही नाराजी शहर विकास आघाडीला अवघड जागचे दुखणे ठरु शकते. त्यामुळे शहर विकास आघाडीचे सध्या ताक देखिल फुंकून पिण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण डिजास्टर मॅनेजमेन्ट करणारा एकही नेता आता शहर विकास आघाडीकडे दिसत नाही. अंर्तगत कलहाचे पडसाद आता उघडपणे सार्वजनिकरित्या मांडले जात आहेत. अशामध्येच आ. भारत नाना भालके आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले एकत्र दिसल्याने एकच चर्चा सुरु झाली.

वास्तविक हे दोघेही सामाजिक कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. आणि योगायोगाने त्यांची भेट झाली होती. मात्र राजकारणात असे योगायोग घडवून देखिल आणले जातात हे ही तितकेच खरे.