Home पंढरपूर पंढरपूरकरांचे मोबाईल चोरण्यासाठी शंभर किलोमीटर वरून “ती” यायची कारने.

पंढरपूरकरांचे मोबाईल चोरण्यासाठी शंभर किलोमीटर वरून “ती” यायची कारने.

2263
0


पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील भाजी मंडईतील बाजाराला एक महिला १०० कीलोमीटर वरून
कारने यायची अन् भाजी खरेदीला आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरुन जायची. मोबाईल चोरी करणाºया महिलेसह तिघांना अटक केली असल्याची माहिती पोनि. अरुण पवार यांनी सांगितले.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकी हिरालाल गुजर (वय ३२, रा. जुना कराड नाका, पंढरपूर, जि. सोलापूर) हे ४ जून रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास नवीपेठ येथील भाजीमंडई मध्ये गेले होते. त्याठिकाणी त्यांचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोेरी केला होता. विकी हिरालाल गुजर यांच्या प्रमाणेच त्या दिवशी बाजारातील इतर तीन चार लोकांचे मोबाईल चोरी गेले होते.


या प्रकरणी पोनि. अरुण पवार यांनी पथक तयार करुन बाजारात लक्ष ठेवण्यासाठी पोलीसांची नेमणूक केली.
त्यावेळी एक महिला काही जणांसोबत येऊन मोबाईल चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांचे नाव
शहीदा महादेव तुपे (वय ३६, पानवन, ता. माण, जि. सातारा), भोजलिंग महादेव तुपे (रा. पानवन, ता. माण, जि. सातारा), अहमद नजीर सय्यद (वय २९, रा. बाळकृष्ण नगर, माढा रोड कुर्डुवाडी, जि. सोलापूर) समजले. या तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई अरुण पवार, सपोनि नवनाथ गायकवाड पोहेको सूरज हेंबादे, बिपीन ढेरे, पोना गणेश पवार, प्रसाद आवटी, सिध्दनाथ मोरे, पोना. अभिजीत कांबळे, पोना. भाग्यश्री घाडगे, सविता भोजने यांनी केली.

ताब्यात घेतलल्या महिला व इतर दोघांकडून चार मोबाईल जप्त केले आहे. त्याच बरोबर या तिघांकडे मोबाईल खरेदी केलेल्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पो. नि. अरुण पवार यांनी केले आहे.

२ दिवस पोलिस कोठडी

मोबाईल चोरी प्रकरणातील तिघांना न्यायालयात हजर केले असता. न्यायाधीशांनी त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पो. नि. अरुण पवार यांनी दिली.

इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

मोबाईल चोरी प्रकरणात अटकेत असलेल्या तिघाविरुद्ध सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.