Home पंढरपूर पोलिस अधिक्षक पथकाची वाळू उपशावर धाड , एकाच तळावर तब्बल १२५ ब्रास...

पोलिस अधिक्षक पथकाची वाळू उपशावर धाड , एकाच तळावर तब्बल १२५ ब्रास वाळू जप्त.

1036
0

पंढरपूर :- पंढरपूर शहरानजीक असणाऱ्या इसबावी येथिल भीमा नदीवर असणाऱ्या जॅकवेल जवळ पोलिस अधिक्षक पथकाने धाड टाकून तब्बल १२५ ब्रास वाळू जप्त केलीय. शहराजवळ शेकडो ब्रास वाळू जप्त झाल्याने एकच खळबळ माजलीय.बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आलीय.

या कारवाईत सात आरोपींवर भादंवि कलम 379,34गौण खनिज कायदा 1978चे कलम 4 (1)4(क)
(1),21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस कर्मचारी कल्याण विठ्ठल भोईटे (वय 40वर्षं नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापुर ग्रामीण संलग्न विशेष पथक सोलापुर ग्रामीण) यांनी फिर्याद दाखल केलीय. या कारवाईत तब्बल 38 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामधील १२५ ब्रास वाळूची किमत 8 लाख 75 हजार रुपयांची आहे. तर 7 लाख 7 हजार रुपये किमतीचा किमतीचा (MYA-2511) 407टँम्पो , 6 लाख 3 हजार रुपये किंमतीचे महिंद्र पिकअप (क्र MH13R0559) , 5,लाख 3 हजार रुपये किमतीचे विना क्रमांकाची अशोक लेलंड कंपनीची गाडी, 6 लाख 7 हजार रुपये किमतीचे विना क्रमांकाचा 407टँम्पो त्याचा चेसी क्र 357515BT7803865, 5 लाख 3 हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची पांढ-या रंगाची टाटा योद्धा , 40 हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर (क्र MH13AY51248) , 40 हजार रुपये किमतीची होडा फँशन (MH13BA4555) दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गायकवाड हे करीत आहेत.

1)लखन शिवाजी घंटे (वय 30वर्ष रा इसबावी सह्याद्रीनगर पंढरपुर) 2)सचिन शंकर शिंदे (वय 33वर्ष रा इसबावी सह्याद्रीनगर पंढरपुर) 3)विजय मधुकर मेटकरी (वय 30वर्ष रा देवकते मऴा पंढरपुर)  4)राम नारायण शिंदे (वय 25वर्ष रा वाखरी ता पंढरपुर)  5)विजय अशोक पवार (वय 21वर्ष रा जुनी वडार गल्ली पंढरपुर)  6)गणेश सुभाष झाडबुके (वय 23वर्ष रा संतपेठ पंढरपुर)  7) राहुल भारत धोञे (रा जुनी वडार गल्ली पंढरपुर) अशी आरोपींची नावे आहेत.