Home पंढरपूर पंढरपूर मंगळवेढा विधान सभा मतदार संघाची जागा शिवसेनेकडेच होती : शिवाजी सावंत...

पंढरपूर मंगळवेढा विधान सभा मतदार संघाची जागा शिवसेनेकडेच होती : शिवाजी सावंत – सेना नेत्या शैलाताई गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाचे झाले उद्घाटन.

1154
0

पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाची विधानसभेच्या जागेवरून शिवसेना व राष्ट्रवादीत वाद रांगणार

पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाची विधानसभेची रिक्त जागेची निवडणूक समोर ठेऊन पंढरपूर येथे शिवसेनेचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच ही जागा शिवसेनेकडेच होती असे वक्तव्य सावंत यांनी केले आहे. यामुळे पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाची विधानसभेच्या जागेवरून शिवसेना व राष्ट्रवादीत वाद रांगणार आहे. या जागेवर शैलाताई गोडसे इच्छुक आहेत.

पंढरपूर येथे शिवसेनेचे महीला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी पंढरपूर येथे महीला आघाडी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्दघाटन शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत आहे.

सावंत पुढे म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे.
याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा होता. पुन्हा युती झाली ही जागा भाजपाकडे गेली. सध्या महाराष्ट्रीत तीन पक्षाच सरकार आहे. हे राजकारण आहे. वेळ कधी बदलेल काय सांग. स्वबळावर लढावं लागलं तर शिवसैनिक तयारच असतो, असे शिवाजी सावंत यांनी सांगितले.

त्याचबरोबर मागील निवडणुकीत शैला गोडसे यांच्यावरआन्याय झाला आहे. पंढरपूर मंगळवेढा ही जागा राष्ट्रवादीची असली तरी निवडणूक लढवायची तयारी ठेवायची असे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेत वाद होणार हे निश्चित झाले आहे.
यावेळी जेष्ट नेते साईनाथ अभंगराव, भैरवनाथ शुगर व्हा.चेअरमन अनिल सावंत,अरुण भाऊ कोळी, शहर प्रमुख रवी मुळे, तालुका प्रमुख महावीर देशमुख, सुधीर अभंगराव, पैलवान सिद्धनाथ कोरे, ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख जयवंत माने, महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे, उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे,नाना सावंतराव,तानाजी मोरे,पंकज डांगे यांच्यासह विभाग प्रमुख , महिला पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.