Home पंढरपूर पंढरपूरच्या सबजेलमध्ये कोरोनाचा हादरा.

पंढरपूरच्या सबजेलमध्ये कोरोनाचा हादरा.

456
0

पंढरपूर :- पंढरपुरातील सब जेलमध्ये आज तब्बल २१ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. शुक्रवारी पाच कैद्यांना लक्षणे जाणून लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये ४ कैदी कोरोना बाधित आढळून आले होते.
पंढरपूर सबजेलमध्ये एकूण 50 कैदी आहे. शुक्रवारी यापैकी चार कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे उर्वरित ४६ कैद्यांची शनिवारी कोरोना टेस्ट घेण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयांमध्ये घेतलेल्या कोरोना टेस्टमध्ये 21 कैदी कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यामुळे सब जेल मधील कोरोना बाधितांची संख्या आता 25 झाली. बाधित झालेल्या सर्व कैद्यांना वाखरी येथिल एमआयटी कोवीड केअर सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सब जेल मधील कैदी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडलीय.