Home पंढरपूर स्व. सुधाकरपंत परिचारकांचा पुतळा जरुर उभा करा ….. पण तत्पूर्वी

स्व. सुधाकरपंत परिचारकांचा पुतळा जरुर उभा करा ….. पण तत्पूर्वी

1611
0

पंढरपूर :- पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पंढरपूर शहरामध्ये माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपा आणि पंढरपूर विकास आघाडीकडून घेण्यात आलेला आहे.तसेच,पंढरपूरातील नव्याने होणार्‍या नामसंकिर्तन सभागृहास माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे नाव देण्याचा हि ठराव मंजुर करण्यात आला आहे. मात्र नामसंकीर्तन सभागृहाला लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांचे नाव द्यावे. तर स्व. सुधाकरपंत परिचारकांच्या पुतळ्यापुर्वी कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांचा पुतळा उभा करा अशी मागणी कर्मवीर औदुंबर पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्षीय अमरजीत पाटील यांनी केलीय. ज्या सर्वसाधारण सभेत स्व. पंतांचा पुतळा बसविण्याचा ठराव करण्यात आला. ती सभाच बेकायदेशीर असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय.

सदर दोन्ही ठराव व सर्वसाधारण सभा पार पडत असताना विरोधी आमदार भारत भालकेच्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे एकही नगरसेवक सदर सभेस उपस्थितीत नव्हते.याबाबत आमदार भारत भालके यांच्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून मा.जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करुन सदर बैठक व बैठकीमधील करण्यात आलेले ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

पाटील पुढे म्हणतात , नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आॅनलाईन होणार असल्याचा अजेंडा नगरसेवकांना काढण्यात आला होता असे समजते.परंतु,सत्ताधारी भाजपा – पंढरपूर विकास आघाडीने विरोधी आमदार भालकेंच्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवत सभागृहात आपल्या नगरसेवकांना उपस्थितीत ठेवत सर्वसाधारण सभा पार पाडली व त्यामध्ये वरील ठरावांसह अन्य ठराव मंजुर केले.भाजपा – पंढरपूर शहर विकास आघाडीची सदर कृती आणि कामकाज बेकायदेशीर आहे.हे मात्र सत्य आहे.याबाबत मा.जिल्हाधिकारी तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या तक्रारीवर काय निर्णय घेतात ? आमदार भालके सदर विषयात किती लक्ष घालतात हे बघणे महत्वाचे आहे.

नियोजित नामसंकिर्तन सभागृहास माजी आमदार सुधारकरपंत परिचारक यांचे नाव देणे योग्य होणार नाही.श्रीमंत सुधारकपंत परिचारक यांचा आणि कला क्षेत्राचा काही संबंध येत नाही.त्यांच्या नावाऐवजी पंढरपूरातील नामवंत कलावंत लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांचे नाव सदर नामसंकिर्तन सभासगृहास देणे योग्य ठरेल. तसेच,श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपूरमध्ये जरुर उभारवा,परंतु त्याआधी पंढरपूर तालुक्याच्या कृषी – औद्योगिक क्रांतिचे जनक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपूरातील सरगम चौकात आधी उभारण्यात यावा ! तसेच, कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्या संदर्भात आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार भारत भालके यांनी आपआपली भुमिका स्पष्ट करावी. ती वेगवेगळी करावी का एकत्रित करावयाची याचा निर्णय त्यांनी त्यांच्या पातळीवर घ्यावा. अशी मागणी अमरजीत पाटील यांनी केलीय.
वास्तविक पुतळा बसविण्याबाबत कोणताच ठराव झाला नसल्याचे समजते.