सोलापूर :- चक्कर येवून पडलेल्या बॉन्ड रायटरला पोलीस असल्याची बतावणी करुन तुझ्यावर कारवाई करतो असं धमकावून एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्याकडील २८ हजाराचा ऐवज काढून घेतला.हा प्रकार सोलापूर जिल्हा परिषदेत्या आवारातील उत्तर पंचायत समिती कार्यालयाजवळ घडला आहे.
महिबूब दस्तगीर शेख ( वय ५८ रा . सिध्देश्वर पेठ ) हे या ठिकाणी बॉन्ड रायटींगचं काम करत कट्ट्यावर बसतात. त्यांना तिथेच पोटामध्ये दुखत असताना चक्कर आली आणि ते झाडा खाली बसून होते.
यावेळी तिथे आलेल्या एका इसमानं तुम्ही येथे काय करत बसला आहे मी पोलीस आहे मला ओळखत नाही का ? असा म्हणून त्यांच्या खिशातील ७५०० रुपये रोख , मोबाईल हॅन्डसेट आणि यामाह मोटारसायकल गाडी ताब्यात घेतली,उद्या चौकीला ये, मला शिंदे साहेब म्हणतात असं सांगून निघून गेले. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर महिबूब शेख यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.