Home पंढरपूर बा विठ्ठला अशा प्रवृत्तीना तूच बघून घे; पंढरीत रक्तदानात राजकारण.

बा विठ्ठला अशा प्रवृत्तीना तूच बघून घे; पंढरीत रक्तदानात राजकारण.

1387
0

पंढरपूर:- शहर आणि तालुक्यामध्ये आपल्या माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर आणि श्याम गोगाव मित्र मंडळाच्या वतीने सोळा वर्ष रक्तदान शिबिर घेण्यात येते. कोणतेही राजकारण न करता आजारी पडल्यानंतर गोरगरिबांची रक्तासाठी होणारी परवड थांबावी यासाठी फक्त मैत्री च्या जोरावर हा रक्तदानाचा उत्सव यशस्वीरित्या पार पडतो. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत कुणी दूध पिऊन तर कोणी दारू पिऊन करतो. मात्र सोळा वर्षे झाली ह्या मित्र मंडळाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त रक्तदान केले जाते.

मात्र यावर्षी काही राजकारण्यांच्या खोट्या तक्रारीमुळे हा रक्तदानाचा उत्सव रद्द करण्यात आलाय. गेली नऊ महिने जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागलाय.

या पार्श्वभूमीवर सरकारने मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केलं होतं. यानंतर राज्यता ठिकठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली.
कुणी एक किलो चिकन-मटण दिले तर कुणी हेल्मेट, पाण्याचा जार दिला.

सतत सोळा वर्ष हे पुण्याचे काम करणाऱ्या मित्रमंडळाने कधीच रक्तदात्याला गिफ्ट देण्याचा विचार केला नाही. मोठं मोठ्या नेत्यांना जे जमत नाही ते कामं या मित्रमंडळाच्या वतीने मैत्री साठी केलं जातं होते. यांना समोरासमोर लढून जिंकता येत नाही हे प्रत्येकाच्या लक्षात होते. आज अखेर संधी मिळाली. रक्तदात्याला प्रलोभन दाखवून रक्तदान केलं जातं असल्याची खोटी तक्रार “काही” लोकांनी केली. आणि चिकन – मटण, हेल्मेट, पाण्याचे जार वाटताना झोपलेली प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. मृत्युशी झुंज देण्याऱ्या रुग्णाला अव्वाच्या सव्वा दराने रक्त पुरवठा केला जातो, रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक केली जाते अशा अनेक तक्रारी प्रशासनाकडे केल्या जातात मात्र कधीही कोणत्याच रक्तपेढी वर कारवाई केली जात नाही. यावेळी प्रशासन झोपेचे सोंग घेते. आज मात्र ही कुंभकर्णी यंत्रणा जागी झाली आणि पंढरपूरच्या शिबिराला कोणत्याच रक्तपेढीने रक्त संकलन करण्यास जाऊ नये असा तालिबानी फतवा काढला.

जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे विनवणी केली. आम्ही कोणतेही प्रलोभन देत नाही देणार नाही असे हमीपत्र लिहून दिले. तरी देखील प्रशासनाने रक्त संकलनाची तयारी दाखवली नाही. आमच्याकडे यंत्रणा उपलब्ध नसल्याचे कडक उत्तर देण्यात आले. याविषयाची तक्रार आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकड़े करण्यात आलीय.

अखेर वैरयांना यश आलं आणि सोळा वर्षांची परंपरा खंडित झाली. अखेर सोळावं वरीस धोक्याचे असते ते खरं झालं. असो माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर आणि शाम गोगाव मित्रमंडळाच्या वतीने अश्वशक्तीने पुन्हा हा जीवादानाचा उत्सव घेणार आणि गरिबांचे जीव वाचवणार असाच निर्धार केला जातोय.