Home पंढरपूर राज्यात सत्ता पण पक्ष संघटन कमकुवत. राष्ट्रवादी युवती काँग्रेस मध्ये पदावरून...

राज्यात सत्ता पण पक्ष संघटन कमकुवत. राष्ट्रवादी युवती काँग्रेस मध्ये पदावरून वादावादी ; नगरपालिका निवडणुकीत स्पर्धक नको म्हणून पदावरून काढल्याचा कीर्ती मोरेंचा श्रीया भोसलेंवर आरोप

536
0

पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून संघटना वाढीसाठी निर्णय घेतल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीया भोसलेंचे स्पष्टीकरण

पंढरपूर :- राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा पाच वर्षे विरोधी बाकावर बसणार असा कौल असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावून शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन केली आणि राज्यात सत्ता आणली.

लवकरच …..

ही ऐतिहासिक आघाडी करण्याचे करण्याचे मुख्य कारण होते पक्ष वाचवणे. कारण तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या सत्ता काळात काँग्रेस , राष्ट्रवादीचे अनेक मोहरे गळाला लावले होते. ती पडझड थांबावी यासाठी पवारांनी सेने बरोबर आघाडी केली.
मात्र राज्यात सत्ता मिळाली असली तरी पक्ष संघटना मजबूत होताना दिसत नाही. पदाधिकाऱयांचे हेवे दावे , स्पर्धा यामुळे पक्षाला उतरती कळा लागत आहे.
याचा प्रत्यय सध्या पंढरपूर मध्ये येत आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कीर्ती मोरे यांना अचानकपणे पदावरून काढून नवी नियुक्ती केल्याने आता वाद निर्माण झालाय.
मोरे यांनी युवती जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांच्यावर एकाधिकारशाहीचे थेट आरोप केले आहेत.
कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे. तसेच आम्ही दोघीही पंढरपूर शहराच्या रहिवासी आहोत. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत आपल्याला स्पर्धक नको त्यामुळेच मला पायउतार केल्याचा गंभीर आरोप मोरे यांनी केलाय. आपण याविषयी पक्षश्रेष्ठींना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या पडत्या काळात आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आणि आता वापर करून झाल्यावर बेदखल केले जात आहे. अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरूनच निर्णय – श्रीया भोसले

तालुक्यात पक्ष संघटना वाढली पाहिजे हा माझा मुख्य उद्देश आहे. संघटना वाढीसाठी काही कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त असते. त्यानुसारच पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरूनच कीर्ती मोरे यांचे पद काढले असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी दिले.

पवार कुटुंबाचे सोलापूर जिल्हासह पंढरपूरवर विशेष प्रेम आहे.
राज्यात सत्ता असताना , सोलापूरचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी कडे असताना पंढरपूरात मात्र पक्ष संघटना वाढताना दिसत नाही. पक्षांतर्गत पदाधिकारी एकमेकांवर कुरखोडी करण्यातच व्यस्त आहेत. कुणाचा कुणावर धाक नसल्याने कार्यकर्ते शंभर अन प्रत्येक जण मेंबर अशी अवस्था झालीय.
पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे एकमेकांच्या सहकारी संस्था असो वा राजकारण? यावरून चिखलफेक सुरू असताना आता यूवती काँग्रेसने देखील हम भी किसींसें कम नही हे दाखवून दिले आहे.
गटाबाजीची झळ शेवटच्या घटकापर्यंत पोहचली असताना आता तरी पक्षश्रेष्ठी लक्ष देणार का ? याकडे सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.