Home पंढरपूर प्रधानमंत्री आवास योजनेचे नोंदणी कार्यालय दोन महिने झाले बंद. चकरा मारुन नगरापालिकेच्या...

प्रधानमंत्री आवास योजनेचे नोंदणी कार्यालय दोन महिने झाले बंद. चकरा मारुन नगरापालिकेच्या पायऱ्या झिजल्या.

301
0

पंढरपूर:- पंतप्रधान आवास योजनेला अखेर घरघर लागली आहे. पंढरपूर नगरपालिकेत असलेले पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यलयाला गेल्या दोन महिन्यांपासून टाळे ठोकले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. बेघर,वंचित नागरिक नगरपालिकेच्या चकरा मारून दमले आहेत. मात्र नगरपालिकेने हात वर केल्याने दाद कोणाला मागायची हा प्रश्न बेघरांसमोर उभा आहे.

पंतप्रधान आवास योजनेची संपूर्ण माहिती, घरासाठी लागणारी कागदपत्रे, योजने अंतर्गत घरासाठी भरावा लागणार अर्ज यासाठी पंढरपूर नगरपालिकेमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे कार्यालय सुरु करण्यात आले होते. एका खासगी एजेंसीला हे काम देण्यात आले आहे. या एजेंसीने पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण केले आहे . मात्र नगरपालिकेने त्यांचे बिल थकविल्याने गेली 2 महिने झाले बंद आहे. तसेच या योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामावर नियंत्रण ठेवण्याचे काम पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यलयातून होत होते.

नोंदणी कार्यालयच बंद असल्याने बेघर, वंचित आंदोलनाच्या तयारीत आहेत. थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना याबाबत निवेदन पाठवले जाणार आहे. भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट भाजपची सत्ता असणारी नगरपालिका खड्ड्यात घालण्याच्या तयारीत आहे.
घरांची नोंदणी नाही बंद असताना दुसरीकडे मात्र ठेकेदार काम संपवण्याच्या तयारीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असण्याच्या या प्रकल्पाला भाजप पुरस्कृत नगरपालिकाच सुरुंग लागत असल्याची चर्चा पंढरपुरात होत आहे. कार्यालय सुरु ब झाल्यास मल्हार आर्मीने आंदोलनाचा इशारा दिलाय.