Home पंढरपूर एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणु शकतो ; ना. रामदास आठवले यांचा ...

एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणु शकतो ; ना. रामदास आठवले यांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

3305
0

पंढरपूर :- एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो. असा सणसणीत टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना लगावलाय. सोलापूरच्या दौऱ्यात प्रकाश आंबेडकरांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दारुडे असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा आठवलेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. या वक्तव्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

पंढरपूरमध्ये पहाणी दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे बोलताना आठवले म्हणाले, राज्यात भाजप-आरपीआय युती भक्कम आहे. आम्हाल राज ठाकरेंची गरज नाही. उलट ते आमच्या बरोबर आल्यास आमचे मतदान कमी होते.

कंगनाला एक कलाकार म्हणून आमचा पाठिंबा होता. तीच्या देशविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे त्यांनी सांगितले.

बिहार निवडणूकीत भाजप आणि जेडीयुची सत्ता येणार आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

एकनाथ खडसे राष्ट्रवादी गेले तरी त्यांच्या सोबत कुणी जाणार नाही. आणि जरी गेले तर त्यांना काही मिळणार नाही. भाजपमध्ये देखिल इनकमिंग सुरु होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राजाभाऊ सरवदे, सुनिल सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब कसबे, किर्तीपाल सर्वगोड, सचिन भोसले, संतोष पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.