Home पंढरपूर “या” रेल्वे स्टेशनचे केले नामकरण ; लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे...

“या” रेल्वे स्टेशनचे केले नामकरण ; लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे दिले नाव.

654
0

पंढरपूर:- राज्यात औरंगाबाद,अहमदनगर,पुणे,उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या नामांतराचा वाद पेटला असतानाच आता मिरज रेल्वे स्टेशनला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे रेल्वे जंक्शन असे नामांतर आज मध्यरात्री मातंग बांधवांच्या वतीने करण्यात आलाय. यामुळे आता नामांतर वादात महापुरुषांच्या अनुयायांनी देखील उडी घेतल्याने हे लोण आता राज्यभर पसरणार यात शंका नाही.  

सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे जंक्शनला लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे नाव देण्यात यावे यासाठी मातंग समाज गेली 20 वर्षांपासून मागणी करत आहे. या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. मिरज रेल्वे जंक्शन ऐतिहासिक वास्तूला नामकरण करण्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ नेतेमंडळी व विविध पक्ष संघटनांनी वेळोवेळी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून देखील कोणतीही आजपर्यंत दखल घेतली नाही.

यामुळे आक्रमक होऊन मातंग समाजाचे युवा नेते प्रशांतभाऊ सदामते यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांनी मिरज रेल्वे जंक्शन ला साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे रेल्वे जंक्शन मिरज नामकरणचा फलक  रात्री मिरज रेल्वे जंक्शन वर लावण्यात आलाय.