Home पंढरपूर एक लाखाची लाच घेणारे रणजीत मोरे आणि शरद मोरे यांना तीन...

एक लाखाची लाच घेणारे रणजीत मोरे आणि शरद मोरे यांना तीन दिवसांची पोलीस कोठाडी. तक्रारदाराशी मोबाईलवर बोलणारा “तो” अधिकारी कोण?

724
0

पंढरपूर :- तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना सापडलेले पंढरपूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी रणजीत मोरे व खाजगी व्यक्ती तथाकथित साहेबांचा खास माणूस शरद मोरे यास न्यायालयाने तीन दिवस म्हणजे 23 जानेवारी पर्यंत पोलीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचेच्या रकमेचा आकडा पाहता या प्रकरणात बडे मासे हाती लागतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.यातील खाजगी व्यक्ती शरद मोरे यांनी तक्रारदाराला जेसीबी सोडण्याबाबत बड्या अधिकाऱ्याशी मोबाईलवर बोलणे करून दिल्याची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणाचे नवनवीन पैलू पुढे येत आहेत. जेसीबी सोडण्यात यावा आणि गुन्हा दाखल करू नये. यासाठी दोन वेळा मध्यस्थी मार्फत चर्चा घडली होती. वीस ते तीस हजार रुपयांपासून वाढत गेलेली लाचेची रक्कम एक लाखापर्यंत गेली.
जप्त करून गोडाऊन मध्ये लावलेला जेसीबी (MH -13 DM -2266) सोडून देण्याची तयारी देखील झाली होती. यामध्ये एका मोठ्या अधिकाऱ्यांसोबत तक्रारदाराचे बोलणे देखील करून देण्यात आले होते अशी चर्चा आहे. साहेबांचा माणूस म्हणून वावरणाऱ्या शरद मोरे च्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. आणि रंजीत मोरे, शरद मोरे यांना रंगेहात पकडून दिले. यामध्ये पुढील तपासात छाप्यातून निसटलेले बडे मासे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
साहेबांचा खास माणूस म्हणून अनेकांना त्रास देणाऱ्या शरद मोरेच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी लाच लुचपत विभागाकडे केली असल्याची चर्चा तहसील वर्तुळात सुरू आहे.
शनिवारी रणजीत मोरे आणि शरद मोरे यांना न्यायालयात हजर केला असता त्यांना न्यायालयीन तीन दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.