Home पंढरपूर माँ जिजाऊ साहेबांसारखी प्रत्येक स्त्री अनुकरण करत नाही, तोपर्यंत देशातले बलात्कार आणि...

माँ जिजाऊ साहेबांसारखी प्रत्येक स्त्री अनुकरण करत नाही, तोपर्यंत देशातले बलात्कार आणि अत्याचार थांबणार नाहीत-अॅड.कोमल साळुंखे

20
0

पंढरपूर:- देशातल्या वाढत्या रेप केसेस आणि महिलावर होणारे अत्याचाराचे प्रमाण लक्षात घेता, न्याय देवतेकडे न्याय आहे, पण वेळ गेल्यानंतर आहे. आणि म्हणूनच माँ साहेब जिजाऊंनी छत्रपतींना ज्या धाडसाने घडवले आणि शिवाजी महाराजांना स्वतः तलवार बाजी मध्ये निपून करणाऱ्या माँ जिजाऊ साहेबांसारखी प्रत्येक स्त्री अनुकरण करत नाही, तोपर्यंत देशातले बलात्कार आणि अत्याचार थांबणार नाहीत. शिवाय प्रत्येक आई व मुलीने तलवारबाजीचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा सौ कोमल साळुंखे ढोबळे यांनी केले.

प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेबांच्या मार्गदर्शनाने बहुजन रयत परिषद महिला आघाडी,शाहू शिक्षण संस्था व सावली फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने व सर्व महिला पदाधिकारी व सभासद यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवेढा येथील संत दामाजी पुतळ्याजवळ एकत्रित येऊन, जिजाऊ साहेबांच्या वेशभूषेत, मशाल व तलवार घेऊन, जन्मदिवसानिमित्त मंगळवेढा शहरात प्रथमच शिवरायांचा पाळणा म्हणून आगळावेगळा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरूवात पुणे येथील उच्चशिक्षीत तरुणांच्या शाहिरी जलसा ग्रुपचा शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा पोवडयाच्या कार्यक्रमाने झाली.

जिजाऊच्या वेशभूषेत अवंतिका कलुबर्मे,रुपाली कलुबर्मे,भारती धनवे,हरिप्रिया उगाडे शिवाय शहरातील सर्वच स्थानिक मंडळीनी यात सहभागी होऊन महिलांना उत्स्फूर्तपणे साथ दिली. छत्रपतींची जयंती छत्रपतींच्या संस्काराप्रमाणेच सर्वानुमते व कुठलाही भेदभाव न करता सर्व सहभागाने साजरी केली. या उपक्रमात सर्वांनी स्व इच्छेने सामील होऊन एकत्रित येत. कोणासाठी नाही तर केवळ आपल्या बलात्कार व अत्याचार पीडित माता भगिनींसाठी नव्या संकल्पाने एकत्रित येऊन माय माऊलींची ढाल बनुयात असा ठाम निश्चय केला. हा उपक्रम सार्वजनिक शिवजयंती जयंती उत्सव समिती मंगळवेढा,राजे ग्रुप यांच्या सहकार्याने पार पडला.

यावेळी या कार्यक्रमास मंगळवेढा शहराच्या नगराध्यक्ष अरूणा माळी,बहुजन रयत परिषद महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड कोमल साळुंखे,सावली फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा ढोबळे, माजी नगरसेविका भगिरथी नागणे,माधुरी हजारे,संगीता कट्टे,प्रफुल्लता स्वामी,सविता कट्टे,सुवर्णा गोवे,रुपाली जाधव,प्रा.लता माळी, माजी मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर भगरे,संत दामाजी मंदिर समिती अध्यक्ष विष्णूपंत आवताडे,शिवसेना तालुका प्रमुख प्रा येताळ भगत,राजे ग्रुपचे शिवराज कलुबर्मे,अॅड हजारे,संभाजी ब्रिगेड चे दिलीप निकम,धवलदादा युवा प्रतिष्ठानचे सावंजी,सार्वजनिक शिवजन्मत्सोव मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कौंडुभैरे, लहु ढगे,प्रशांत गायकवाड,प्रकाश खंदारे,कट्टे सर उपस्थित होते नगरसेवक व तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.