Home पंढरपूर विठ्ठल मंदिर उघडल्यानंतर मनसेचा आनंदोत्सव.

विठ्ठल मंदिर उघडल्यानंतर मनसेचा आनंदोत्सव.

51
0

 

पंढरपूर:- मागील आठ महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद असलेले येथील  विठठ्ल रुक्मिणी  मंदिर आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खुले केले आहे.

मंदिर दर्शनासाठी खुले केल्यानंतर  मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून मंदिर परिसरात  आनंदोत्सव साजरा केला.

राज्यातील धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करावीत अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे वारंवार  केली होती.  पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ही दर्शनासाठी खुले करावे यासाठी  मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या समवेत येथील महाराज मंडळीनी नुकतीच राज ठाकरे यांची मुंबईतील त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जावून भेट घेतली होती. यावेळी दोन ते तीन दिवसात मंदिर उघडण्यास सरकारला भाग पाडू असे आश्वासन  राज ठाकरे यांनी महाराज मंडळींना  दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळे  दिवाळी पाडव्या पासून खुली केली आहेत.

मनसेने मंदिरे उघडण्यासाठी  केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची भावना व्यक्त करत येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरी जवळ आज  सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लाडू, पेढे वाटप करून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्य वतीने भाविकांना मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप ही करण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,उपजिल्हा अध्यक्ष दिलिप पाचंगे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड,उपाध्यक्ष महेश पवार, आकाश धोत्रे,विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपतालुका अध्यक्ष हेमंत पवार, कृष्णा मसाळ,प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अर्जुन जाधव, सचिन शिंदे,नागेश इंगोले, वैभव इंगोले, दत्ता वलेकर, गणपत मोरे, संतोष भुईटे,महिला आघाडीच्या सौ रंजना इंगोले, सौ पूजा लवंगकर इत्यादी उपस्थित होते.