Home महाराष्ट्र पंढरीत आता येणार रोहीत पर्व – नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी लागली कामाला.

पंढरीत आता येणार रोहीत पर्व – नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी लागली कामाला.

684
0

पंढरपूर :- नगरपालिका , पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागलीय. स्थानिक पदाधिकाऱयांचे हेवेदावे मिटत नसल्याने पक्षासमोर डोकेदुखी वाढली होती.अखेर यावर जालीम उपाय म्हणून पक्षाने पंढरपूरसह करमाळा , भूम-परांडा ,श्रीगोंदा , उस्मानाबाद या मतदारसंघाची जबाबदारी आमदार रोहीत पवारांवर दिलीय.
सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. यामध्ये पंढरपूर, माळशिरस ,माढा , मोहोळ या मतदारसंघावर चांगली पकड होती.मात्र सत्ता येऊनही स्थानिक पदाधिकाऱयांचे हेवेदावे वाढले होते. अशामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असल्याने अखेर आमदार रोहीत पवारांवर जबाबदारी दिलीय.
आमदार रोहीत पवारांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.