Home पंढरपूर पोलिस निरिक्षकाला निलंबित करा – आरपीआयचा ८ सप्टेंबरला धडक मोर्चा .

पोलिस निरिक्षकाला निलंबित करा – आरपीआयचा ८ सप्टेंबरला धडक मोर्चा .

1095
0

पंढरपूर :- आर सी एफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सोनवणे यांनी निरपराध आरपीआय कार्यकर्त्याला केलेल्या अमानुष मानहानीचा निषेध करण्यासाठी तसेच या बेजबाबदार पोलीस निरीक्षकास निलंबित करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मंगळावर 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता चेंबूर फाईन आर्ट जवळील पोलीस उपायुक्त कार्यलयावर प्रचंड निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात फिजिकल डिस्टन्स पाळून आणि मास्क घालून कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे;तालुका अध्यक्ष महादेव साळवे; अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष अनिस पठाण यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

अणुशक्ती नगर सह्याद्री नगर येथील रिपाइं कार्यकर्ते बाबा सुंदरे या निरपराधास आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी बेदम मारहाण केली. या मारहानीच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांना निलंबित करावे या मागणीसाठी डीसीपी कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती तालुका अध्यक्ष अनिस पठाण, महादेव साळवे यांनी दिली आहे.