Home पंढरपूर रक्तदान करून केले छत्रपतींना वंदन – बालाजी मलपे मित्रमंडळाचा उपक्रम.

रक्तदान करून केले छत्रपतींना वंदन – बालाजी मलपे मित्रमंडळाचा उपक्रम.

26
0

पंढरपूर:- श्री दत्त शिवजन्मोत्सव सोहळा समिती व माजी नगरसेवक बालाजी मलपे मिञ परिवाराच्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांची पंढरपूर शहरातील इसबावी मलपे चौक येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीच्या औच्यात्याने सामाजिक बांधिलकी जोपासत आणि महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला कमी रक्तसाठा व राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी नागरिकांनी रक्तदान करण्यास समोर येण्याचे केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते छञपती यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करूण या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे होते.
सखुबाई बजाज रक्तपेढीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये 86जनांनी रक्तदान करून या शिबीरास सहकार्य केले त्याबद्दल व कार्यक्रमास येथिल जेष्ठ नागरिक व समिती पदाधिकारी सदस्य या सर्वांचे पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बालाजी मलपे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.