Home पंढरपूर पवार साहेब भालकेंना साथ द्या, मतदार तर सोबत आहेतच

पवार साहेब भालकेंना साथ द्या, मतदार तर सोबत आहेतच

909
0

पंढरपूर :- पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेचे लोकप्रिय आमदार भारत नाना भालके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवारी सरकोली मध्ये येत आहेत. कायम मतदारांशी नाळ जोडलेले आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनाने राजकीय पोकळी निर्माण झाली आहे . ज्या गोरगरीब, गरजू, कष्टकरी जनतेच्या सुख दुःखात स्व. नानांनी कधीही भेदभाव केला नाही. जस स्व. नानांची नाळ मतदारांशी जोडली तशीच कार्यकर्त्यांना जोडण्याचे कसब पवार साहेबांना चांगलेच ज्ञात आहे. तरी पवार साहेब यापुढेही भालकेंना साथ द्या . आम्हीतर तुमच्या सोबत आहोतच अशी आर्त विनवणी मतदारांची पवार साहेबांकडे आहे.

राज्यातील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 साली पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना यांना उमेदवारी देण्यात आली. मोहिते-पाटलांच्या उमेदवारीमुळे अतिशय एकतर्फी वाटणारी निवडणूक मात्र धक्कादायक झाली. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भालके यांनी हा विजय मतदारांच्या जीवावर संपादित केला.

“राजा का बेटा राजा नही बनेगा” “जो काबिल है वही राजा बनेगा” असा प्रचार करून आमदार भारत नाना भालके यशस्वी झाले . केवळ यावरच न थांबता त्यांनी पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांची वैयक्तिक नाळ जोडली. वास्तविक पाहता या विषयाचे विश्लेषण करताना स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी आधीपासूनच मतदारांचे प्रश्न सोडवण्यात सुरुवात केली होती. एकीकडे मोहिते-पाटलांचा सारखं तगडे आव्हान आणि त्यांच्या सोबत पवारांची टाकत असताना भालके एकहाती विजयी झाले. 2009च्या त्यांच्या ऐतिहासिक सभेचे आठवण आज देखील काढली जाते. आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाला एक रांगड नेतृत्व मिळाले.

त्यानंतर पुढील पाच वर्षात प्रत्येक मतदारासाठी चोवीस तास उपलब्ध होणे, त्यांच्या समस्या सोडवणे, अगदी लहान मुलांना देखील आपलंसं करत, बाल गणेश मित्र मंडळांना वर्गणी असो अथवा लहान मुलांना चॉकलेट हा शिरस्ता त्यांचा सुरू झाला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत भालके यांनी पुन्हा एकदा करिष्मा दाखवत मोदी लाटेमध्ये परिचारक यांच्यासारख्या उमेदवाराला देखील धोबीपछाड केले. दुसऱ्यांदा वेगवेगळ्या चिन्हावर भालके यांनी विजय मिळवून देखील मतदारांशी नाळ तुटू दिली नाही. मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात रस्त्यावर प्रसंगी विधानसभेत आक्रमकपणे रोखठोक भूमिका मांडत सरकारचे लक्ष वेधले. एवढेच नव्हे तर हा प्रश्न नुकताच मार्गी लागला आहे. तसेच शहरातील मंदिराजवळ फुल – प्रसाद विकणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई होत असताना अतिशय आक्रमकपणे स्वर्गीय आमदार भालके रस्त्यावर उतरले. यामध्ये त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. तसेच मराठा आरक्षणासाठी देखील त्यांनी राजीनामा अस्त्र उपसले होते. पहिल्यापासून स्वतःला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पठ्ठा म्हणवून घेणारे भालके 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीत दाखल झाले . यावेळेस केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत होते. तर भाजपने पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्यासारखा तगडा उमेदवार भालकेंसमोर समोर उभा केला. मात्र तिसऱ्यांदा भालके चिन्ह आणि पक्ष बदलून मतदारांसमोर गेले. मात्र याही निवडणुकीत केवळ आणि केवळ मतदारांच्या पाठींब्यावरच भालकेंनी हट्रीक साधली. महाविकास आघाडी ची मोट बांधून सरकार स्थापन झाले . सोलापूर जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी भालके प्रमुख दावेदार होते.मात्र लाल दिव्याच्या मागे न लागता पवार साहेबांकडे मतदार संघातील रखडलेली कामे मार्गी लावा अशी विनंती स्व. भालके यांनी केली.
तालुक्याचे राजकारण , अर्थकारण साखर कारखानदारीवर चालते. मात्र फडणवीस सरकारच्या काळात सहकार तत्वावर सुरू असलेल्या साखर कारखानदारीवर अनेक निर्बध घातले. त्याचा आर्थिक फटका विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला बसला. हा कारखाना पुन्हा उभा रहावा यासाठी आपले सर्व राजकीय वजन , प्रतिष्ठा पणाला लावून राज्य सरकार कडून यथायोग्य मदत पदरात पाडून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यात भालके यशस्वी झाले. याचा काळात कोरोना सारख्या महामारीचे संकट असताना आणि कोरोना बाधित झालेले स्व. भालके नाना केवळ आणि केवळ शेतकरी आणि मतदारसंघातील मतदार राजाच्या कृपाशीर्वादाने त्यांनी कोरोनाला चितपट केलं. खरं तर पवार साहेबांनी आपल्या आजाराचं कधीही भांडवल केलं नाही. किंव्हा त्याचे कारणही पुढे केले नाही . त्याच पावला वरती स्व. नानांनी आपल्या आजाराचे कधीही भांडवल केलं नाही. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतर या जुन्या व्याधींनी डोकं वर काढलं. आणि नुसतं होत्याच नव्हतं झालं नाही तर तालुक्यातील राजकीय पोकळी, लढवय्येपणा, सामान्य नागरिकांचा आधारवड हरपला.
असे जरी असले तरी मतदारसंघातील मतदारांना आजही आणि भविष्यातही भालके यांनी केलेली मदत ती जाहीरपणे जरी नाही दाखवली तरी सलग तीन वेळा या विश्वासाने स्व. नाना विजयी झाले . त्या मतपेटीतून भरगोस दान देताना मतदारराजा आजही हात आखडता घेणार नाही.
पवार साहेब आपण तर कार्यकर्त्यांची नस ओळखणारे आणि अवघे ऐंशी वर्ष जरी पूर्ण झाले असले तरी कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे यातच आपण रममाण असता. सामान्य कार्यकर्ता हाच आपली ताकत आहे. त्यामुळे पवार साहेब सलग तीन वेळा नव्हे तर चौथ्या वेळी सुध्दा भालके यांना साथ देऊ असे अभिवचन देतो मात्र तुम्ही सुद्धा भालके यांच्या पाठीशी रहा अशी आर्त विनवणी मतदारराजा करीत आहे.