Home पंढरपूर पंढरीतील धनगर समाज बांधवांकडून शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांचा सन्मान

पंढरीतील धनगर समाज बांधवांकडून शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांचा सन्मान

134
0

पंढरपूर :- पंढरपूरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याचा मुद्दा गेली अनेक रखडला होता. पंढरपूर विकास आराखड्यातही महापुरुषांच्या पुतळ्यांना वगळण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याचे काम, पंढरपूर विकास आराखड्यात घेण्याचे काम शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांनी केले आहे. यामुळे पंढरपूर शहरातील महत्त्वाचा मुद्दा मार्गी लागला आहे. महेश साठे यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान येथील धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला. कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नूतन अध्यक्ष नरेंद्र पाटील हेही यावेळी उपस्थित होते.

पंढरपूर शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुशोभिकरण करण्याचा मुद्दा मागील अनेक वर्षापासून गाजत होता. या पुतळ्यांसाठी एकाच ठिकाणी जागा देण्यात यावी, असे काही राजकारण्यांचे म्हणणे होते. यास अनेक नागरिकांचा विरोध झाला. तेव्हापासून पुतळ्यांच्या सुशोभीकरणाचा मुद्दा मागे पडला होता. राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे लाखो रुपये खर्चून बनवण्यात आले आहेत. परंतु जागे अभावी आणि निधी वाचून हे पुतळे पडून होते. मागील काही महिन्यात पंढरपूर विकास आराखड्यास मान्यता मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी २००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या आराखड्यातही महापुरुषांच्या पुतळ्यांचे विस्मरण येथील अधिकाऱ्यांना झाले होते. जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी , स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली, आणि या महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरण करण्याचे काम पंढरपूर विकास आराखड्यात सामील करण्यात आले. यामुळे या महापुरुषांच्या पुतळ्यांचे संवर्धन होणार आहे. प्रत्येक पुतळ्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महेश साठे यांच्या या कामाबद्दल , येथील धनगर समाज बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली .रविवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश साठे यांचा , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर सन्मान केला.

याप्रसंगी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, धनगर समाजाचे नेते शालिवाहन कोळेकर,पंकज देवकते, माऊली हळनवर, प्रा. दत्ता डांगे, मारुती मासाल, बालाजी बनसोडे, दिपक येळे, संतोष बंडगर, आण्णा सलगर,नितीन काळे, राजेंद्र बुध्याळ,सोमनाथ ढोणे,महालापा खांडेकर, नाना खांडेकर, वैभव अलदर, प्रशांत घोडके, प्रा.संजय लवटे सर,सुरज सोनलकर,बबन येळे ,