Home पंढरपूर पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा संपन्न. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे...

पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा संपन्न. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वाटप

338
0

पंढरपूर:- पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा संपन्न झाली. रविवारी सायंकाळी 6 वाजता गाताडे प्लॉट, जुना कराड नाका येथे सदर स्पर्धेचा पारितोषक वितरण मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

यावेळी प्रथम क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्या कु. नेहा सुनिल आसबे, दाळे गल्ली, पंढरपुर यांना पंढरपुर तालुका शिवसेनेचे प्रथम तालुका प्रमुख अरुण (भाऊ) कोळी यांच्या शुभहस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन सन्मानीत केले. तसेच द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता चि. लिंगेश्वर शशिकांत कुंभार, दाळे गल्ली, पंढरपुर यास शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीरभाऊ अभंगराव व शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे यांच्या शुभहस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन सन्मानीत केले. याबरोबरच तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता चि. संदीप मोहीते, घडशी गल्ली, भादुले चौक, पंढरपुर यास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे जिल्हा प्रमुख जयवंतआण्णा माने व शिवसेना पंढरपुर तालुका संघटक संदीपभैया केंदळे यांच्या शुभहस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन सन्मानीत केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे यांनी केले होते.

या कार्यक्रमात 6 जणांना उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आले, त्यात अनुक्रमे कु. ऐश्वर्या सतिश कुलकर्णी मेंढेे गल्ली पंढरपुर, चि.अभिषेक कुलकर्णी हरीनयन पार्क, इसबावी, कु.श्वेता लक्ष्मण घाडगे, दाळे गल्ली पंढरपुर, चि.प्रथमेश रसाळ, सहकार तालीम शेजारी, पंढरपुर, चि.समर्थ राजकुमार तावसकर, झेंडे गल्ली, पंढरपुर, कु. आदिती मनोज पिंपळे, दाळे गल्ली पंढरपुर यांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आले. या किल्ले स्पर्धे मध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या प्रत्येक सभासदाला प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा प्रमुख सिद्धनाथ कोरे, शिवसेना उपशहर प्रमुख पोपटनाना सावतराव, बाबासाहेब अभंगराव, विनय वनारे, समाधान अधटराव, अविनाश वाळके, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी, अरुणभाऊ कांबळे, विजय जाधव, पप्पू पितळे, गणेश वाघमारे, शाखा प्रमुख प्रणित पवार, शिवाजीराजे कोष्टी तसेच शिवसेना पंढरपुर शहर मधील तमाम शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे, पंकज डांगे-कोळी, महेश भोसले, राघवेंद्र ऐनापुरे, गुरु अष्टेकर व अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.