पंढरपूर :- जमिनीच्या वादातून युवकाची हत्या केल्याची घटना पंढरपुरात घडलीय. कार खाली घालून रविकांत पाटील या युवकाचा पंढरपूर-सोलापूर मार्गावर देगाव जवळ ही घटना मंगळवारी सकाळी घडलीय. या प्रकरणी तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
टाकळी येथील देठे आणि पाटील कुटुंबात हॉटेल वैभवराजच्या जागेवरून वाद होता. यातून मयत आणि आरोपींमध्ये अनेक वेळा मारामारी झाल्याचे समजते. याच वादातून मंगळवारी सकाळी परमेश्वर देठे आणि त्यांच्या साथीदारांनी रविकांत पाटील या युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करून कार खाली चिरडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या हत्यने एकाच खळबळ माजली आहेत.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात