Home Uncategorized ….. तर परिचारकांप्रमाणे राजन पाटलांना देखील परिणाम भोगावे लागतील ; आजपासून जिथे...

….. तर परिचारकांप्रमाणे राजन पाटलांना देखील परिणाम भोगावे लागतील ; आजपासून जिथे जिथे परिचारक तिथे तिथे महाडिक निवडणूक रिंगणात

283
0

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन‌ पाटील यांना भाजपात घेण्यास खासदार धनंजय महाडीकांचा विरोध…

पंढरपूर :- पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांना हॅटट्रिक करण्याचा विश्वास असून त्यांनी विरोधकांवर टिका केली आहे. प्रचार सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी लग्नापूर्वीच माझ्या मुलांना मुलं झाल्याचे वक्तव्य केले होते. आणि याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच माझी मुलं 302 कलम भोगून आले असल्याचे बोलले होते. पाटलांच्या या वक्ताव्याचे परिचरकांप्रमाणे परिणाम भोगावे लागतील. तसेच विरोधाला विरोध म्हणून पाटील-परिचारकांनी निवडणूक लादली. आपण कधी स्थानिक निवडणूकांमध्ये लक्ष दिले नव्हते. आता मात्र जिथे जिथे परिचारक – पाटील निवडणूक लढतील तिथं तिथे महाडिक विरोधात उतरतील असा थेट इशारा त्यांनी दिला.

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या १५ जागांसाठी आज मतदान सुरू आहे. १९ हजार ५०० मतदार आपला हक्क बजावत आहेत. खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे पुत्र विश्र्वराज महाडिक यांनी आपला मतदान केले.

विरोधकांनी प्रचाराची पातळी सोडली , प्रचारातून दहशत आणि गुंडगिरीचा समर्थन केल्याने त्यांना मतदार नाकारातील आणि जनता हॅटट्रिक करण्याची संधी देईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असल्याचे विचारले असता असंस्कृत लोकांना व समाजात दहशत पसरवणाऱ्या अशा लोकांना भाजप पक्षात घेणार नाही. नक्षत्र घोटाळ्यात स्वतःची अटक टाळण्यासाठी पाटलांची धडपड सुरु आहे. मात्र आमचाही त्यांना विरोध असल्याचे सांगितले खासदार महाडिक म्हणाले. पंढरपूर तालुक्यातील सर्व परिचारक विरोधक एकत्र आले आहेत. श्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, माजी चेअरमन भगीरथ भालके, कल्याणराव काळे, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महाडिक गटाला पाठींबा दिल्याने महाडिकांचे पारडे जड झाले आहे.