Home पंढरपूर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांना दुसर्‍यांदा पालकमंत्र्यांचा मान.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांना दुसर्‍यांदा पालकमंत्र्यांचा मान.

125
0

सोलापूर :-


येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्याचा मान पुन्हा एकदा सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मिळणार आहे. खर्‍या अर्थाने पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण केले जाते मात्र सध्या सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असल्याने ते नगर येथे शासकीय ध्वजारोहण करणार आहेत. त्यामुळे सोलापूरचे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांच्याकडे असणार आहे.

2022 मध्ये देखील 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त होणार्‍या ध्वजारोहणा वेळीही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे 15 ऑगस्टला ही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्तेच शासकीय ध्वजारोहण करण्यात आले होते. त्यामुळे आता 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरच शासकीय ध्वजारोहण करणार आहेत. त्यामुळे सलग दुसर्‍यांदा जिल्हाधिकार्‍यांना हा मान मिळालेला आहे.

ध्वजारोहणा पूर्वी संविधानाच्या प्रस्ताविकाचे होणार वाचन
येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्‍ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी होणार्‍या ध्वजारोहणापूर्वी भारताच्या संविधाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करावे अशा सूचना ही शासनाकडून आलेल्या आहेत. त्यामुळे ध्वजारोहणापूर्वी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन केले जाणार आहे.