Home पंढरपूर आई-वडीलाने दोन चिमुकल्यांसह गळफास घेवून जीवन संपवले.

आई-वडीलाने दोन चिमुकल्यांसह गळफास घेवून जीवन संपवले.

708
0

पंढरपूर:- सामूहिक आत्महत्येनं पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आहे. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे. या दाम्पत्यानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या सामूहिक आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अतुल शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मृत अतुल शिंदे हे ओळखपत्र तयार करण्याचं काम करत होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अतुल आणि जया यांचा २०१३ साली प्रेम विवाह झाला होता. पुण्यातील वाघजाईनगर इथे दोघंही राहात होते. त्यांना दोन मुलं होती. पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान या दाम्पत्यानं 6 वर्षीय श्रुग्वेद आणि 3 वर्षांच्या अंतरासोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. भारती विद्यापिठ पोलिस घटनास्थळावर दाखल गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.