Home महाराष्ट्र सुप्रियाताई सुळे , पंकजाताई मुंडे दारू पिऊन नाचतात – बंडा तात्या कराडकरांची...

सुप्रियाताई सुळे , पंकजाताई मुंडे दारू पिऊन नाचतात – बंडा तात्या कराडकरांची जीभ घसरली.

647
0

पंढरपूर:- राज्य सरकारच्या सुपर मार्केट मधून वाईन विक्रीच्या निर्णयाविरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात ह.भ.प बंडा तात्या कराडकर यांची जीभ घसरली. सर्वच नेत्यांची मुलं दारू पितात. खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे या दारू पिऊन नाचतात असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
आज साताऱ्यात वाईन विक्री विरोधात बंडा तात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मोर्चा काढण्यात आला. सरकारवर मद्याची धुंदी चढलीय. आम्ही वाईन विक्रीच्या विरोधात आहोत. हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर याचा वणवा पेटलं असा इशारा त्यांनी दिला. ढवळ्या शेजारी पवळ्या गेला अन वाण नाय पण गुण लागला असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पवळ्या आहेत. ते ढवळ्या म्हणजे अजित पवारांच्या सोबत सत्तेत गेले अन बिघडले आहेत.
पुढे बोलताना मात्र त्यांनी राज्यातील नेत्यांवर तोफ डागली.
माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचा मुलगा दारू पिऊन मृत्यूमुखी पडला तर सर्वच नेत्यांची मुलं दारू पितात. राजकारणात येण्यापूर्वी सुप्रियाताई सुळे दारू पिऊन पडलेल्या अनेक फोटो आपणास मिळतील. सुप्रियाताई सुळे आणि पंकजाताई मुंडे दारू पिऊन नाचतात. असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
एका संत विचारांच्या व्यक्तीने महिला नेत्यांबद्दल अशी खालच्या थराची वक्तव्ये केल्याने बंडा तात्यांचा निषेध केला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी सोशल मीडियावर बंडा तात्यांचा निषेध केला आहे.