Home पंढरपूर शिक्षक मतदार संघातील उमेदवार आमदार दत्तात्रय सावंतांची राष्ट्रवादी वर भिस्त . महाविकास...

शिक्षक मतदार संघातील उमेदवार आमदार दत्तात्रय सावंतांची राष्ट्रवादी वर भिस्त . महाविकास आघाडीसह भाजपने लावली ताकत.

1365
0

पंढरपूर:- पुणे शिक्षक मतदार संघ निवडणूकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट लढत होत आहे. मात्र विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत हे कट्टर पवार समर्थक आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी पवारांचे आशीर्वाद घेतले होते. त्यामुळे आमदार सावंताची भिस्त ही राष्ट्रवादी वर अवलंबून चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

सध्या राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. यामध्येच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका होताहेत. महाविकास आघाडी आणि भाजपने आपले स्वतंत्र उमेदवार दिले आहेत त्यामुळे राजकीय चुरस वाढलिय.
पुणे शिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह 35 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत पून्हा एकदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडी मधून पुणे शिक्षक मतदार संघाची जागा काँग्रेसला सुटली आहे. या जागेवर कोल्हापूर येथील जयंत आसगावकर हे उमेदवार आहेत. तर पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी चे अरुण लाड हे रिंगणात आहेत.
आसगावकारांच्या विजयासाठी काँग्रेस चे गृहमंत्री सतेज पाटील , राष्ट्रवादी चे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , मंत्री जयंत पाटील, सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कंबर कसली आहे. आसगावकरांच्या विजयासाठी मंगळवारी सोलापूरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीचे आमदार बबन दादा शिंदे, यशवंत माने , प्रणिती शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दीपक आबा साळुंखे यांच्यासह मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि संस्था चालक, विविध शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते
या बैठकीत आसगावकारांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आलाय.
तर दुसरीकडे 2014 साली राष्ट्रवादीच्या मदतीने निवडून आलेले विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत हे एकाकी पडलेले दिसत आहेत. त्यांनी शेवटपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी प्रयत्न केले. पण जागा काँग्रेसला सुटल्याने काहीच उपयोग झाला नाही.
तरीही आमदार सावंत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
मात्र जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तशी राजकीय पक्षांनी मतदार बांधणी सुरू केली आहे.
तर भाजप कडून सोलापूर चे जितेंद्र पवार यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्या विजयासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार रणजितसिंह निबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ही जागा खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
यामुळे सुरवातीला आमदार दत्तात्रय सावंत यांना सोपी वाटणारी निवडणूक आता अवघड झाली आहे.
या तिरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेच साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.