Home पंढरपूर रांझणीत टेम्पोने धडक देऊन एकाचा खून; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रांझणीत टेम्पोने धडक देऊन एकाचा खून; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

1442
0

पंढरपूर :- रांझणी ( ता. पंढरपूर) येथे टेम्पोने धडक देऊन एकाचा खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत व्यक्तीचे सावकार उर्फ महादेव नारायण साळुंखे (वय २७, रा. रांझणी, ता. पंढरपूर) आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावकार उर्फ महादेव नारायण साळुंखे ( रा. रांझणी, ता. पंढरपूर) हे पंढरपूर कडून त्यांच्या गावी परत जात होते. यावेळेस समोरून येणाऱ्या एम एच ४७ टी ३८२५ या टेम्पोने चुकीच्या बाजूने येऊन महादेव नारायण साळुंखे यांना धडक दिली. यामध्ये सावकार उर्फ महादेव साळुंखे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक बंडू उर्फ सुरज कांतीलाल दांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटना स्थळी पोलीस उप अधीक्षक सागर कवडे, पोनी. किरण अवचर यांनी भेट दिली.

यांनतर मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याने हा अपघात नाही असा आरोप केला आहे. याची चौकशी करून दत्ता सुरवसे, योगेश चौगुले, बंडू ऊर्फ सुरज कांतीलाल दांडगे, दत्ता रामचंद्र पवार ( सर्व रा. रांझणी, पंढरपूर) यांच्या विरुध्द खुनाचा दाखल केला आहे.