पंढरपूर :- फळ विक्रेते यल्लाप्पा घूले यांच्या आत्महत्या कारणीभूत ठरल्याने खाजगी सावकार डॉ. आनंद गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश बी. बी. तोष्णीवाल यांनी फेटाळला आहे.
संतपेठ मधील फळ विक्रेता यल्लाप्पा घुले यांनी डॉ. आनंद गायकवाड यांच्याकडून 70 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर डॉक्टर व त्यांच्या माणसाने पैसे वसुलीसाठी यल्लाप्पाच्या पाठीमागे तगाला लावला. त्याच त्रासात कंटाळून यल्लाप्पा यांनी 24 एप्रिल 2022 रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. मात्र पोलिसांनी खाजगी सावकार गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
यल्लाप्पाच्या पत्नीने खाजगी फिर्याद दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने संबंधित सावकारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा खाजगी सावकार डॉक्टर आनंद गायकवाड,सतीश रोकडे,विजय शहाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला. मात्र आरोपी अटक झाला नाही. यामध्ये काही काळबेर असल्याची चर्चा पंढरपूरात सुरु आहे.
दरम्यानच्या काळात डॉ. गायकवाड यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जाण्यासाठी अर्ज दिला होता. 9 जानेवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामध्ये सरकारी वकील अँड सारंग वांगीकर यांनी आरोपीला अटकपूर्व जामीन देणे म्हणजे तपास कामा यंत्रणेमध्ये अडथळा येऊ शकतो. घटनेची गांभीरे पाहता आरोपीला जामीन देऊ नये असे म्हणणे मांडले. न्यायालयाचे म्हणणे सरकार पक्षाचे मत मान्य केले आणि डॉ गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आता तर पोलीस आरोपीला अटक करणार का? असा सवाल उपस्थित केला जातं आहे.