Home क्राईम बापानेच केला सात महिन्याच्या मुलाचा खून ; पंढरपूर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर

बापानेच केला सात महिन्याच्या मुलाचा खून ; पंढरपूर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर

312
0

पंढरपूर :- वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पंढरपुरात समोर आली आहे. स्वतःच्या सात महिन्याच्या मुलाचा कॅनालच्या पाण्यात टाकून खून केल्या प्रकरणी सुभाष साहेबराव डुकरे या संशयित आरोपी बापास पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी आपल्या कुटुंबा समवेत ऊसतोडीच्या कामासाठी पंढरपूर तालुक्यातील सुपली गावात आले होते. 28 डिसेंबर रोजी पंढरपूर पासून जवळ असलेल्या, सुपली हद्दीतील उजनी उजवा कालव्यामध्ये एक लहान मुलगा पडून मयत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने सुपली येथील कॅनल जवळील घटनास्थळाकडे धाव घेतली असता, सात महिन्याचा विक्रांत नावाचा मुलगा कॅनॉलमधील साठलेल्या पाण्यामध्ये पडलेला दिसून आला. संशयित आरोपी वडील सुभाष साहेबराव डुकरे (रा ‌बाभूळगाल जि.नांदेड) यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी टोळी मुकादमावर संशय घेतला होता. पोलिसांनी संशयित मुकादमाची चौकशी केली असता त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. दरम्यान पोलिसांनी आरोपी वडील सुभाष डुकरे यांची अधिक चौकशी केली ही धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रथम दर्शनी पोलिसांनी आरोपी बापाच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खूनाचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही.