Home Video शेत जमिनीतून हुसकावण्यासाठी राहते घर गावगुंडांनी पाडले – पहा व्हिडीओ

शेत जमिनीतून हुसकावण्यासाठी राहते घर गावगुंडांनी पाडले – पहा व्हिडीओ

78543
0
लवकरच वाचकांच्या सेवेत.....

पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथील धक्कादायक प्रकार

पंढरपूर :- शेत जमिनीतून हुसकावून लावण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथील एका शेतमजुराचे राहते घर काही गाव गुंडाने पाडले आहे. यामुळे संजय क्षीरसागर या शेतमजूराचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली‌ नाही उलट त्यांनाच दमबाजी केल्याचे समोर आले आहे.
संजय शिरसागर या शेतमजुराने आपली एक एकर शेत जमीन आपल्या अज्ञान मुलाच्या नावे केली होती.

आता मुलगा सज्ञान झाल्यानंतर त्यांने ती वडिलांच्या परस्पर विक्री केली . त्या शेत जमिनीतून हुसकावून लावण्यासाठी काही गाव गुंडांनी‌ पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेले घर व सौचालय पाडून टाकले आहे.
घर पाडत असताना व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
बेघर झालेल्या संजय क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबाने रात्र अक्षरशा पंढरपुरातील रस्त्यावर काढली.
पोलिसांनी‌ घर पाडणार्या गाव‌ गुंडावर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी शेत मजूर संजय क्षीरसागर यांनी केली आहे.