पंढरपुर :- उजनी धरणात होडीतून फिरण्यासाठी गेलेले दोनजण बुडून मयत झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.अल्ताफ इकबाल शेख (१८) तर समीर याकूब सय्यद(२९) अशी मृतांची नावे आहेत.या दोघांचाही शोध सुरु होता.

समीर सय्यद यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे.त्याच्याकडे मुंबई येथील पाहुणे आले होते.सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी उजनी धरणात निघाले असताना मुंबई येथील पाहुणे त्यांच्यासोबत फेरफटका मारण्यासाठी गेले. सकाळी अकरा वाजन्याच्या सुमारास धरणातील पाण्यात फेरफटका मारताना अल्ताफ शेख याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी समीरने पाण्यात उडी मारली.समीर मासेमारी करणारा पट्टीचा पोहणारा होता परंतु मात्र अल्ताफने त्याला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले.होडीतील इतरांनी आरडाओरड केल्यानंतर आजोबाजूला मासेमारी करणारे मच्छिमार आले.त्यांनी शोध सुरु केला.