Home पंढरपूर भीमा नदीत येणारा विसर्ग वाढला पूराचा धोका.

भीमा नदीत येणारा विसर्ग वाढला पूराचा धोका.

844
0

भीमा नदीत येणारा विसर्ग वाढला , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पंढरपूर:- उजनी धरण क्षेत्रात रविवारी रात्री झालेल्या तब्बल १०० मिलिमीटर पावसामुळे धरणातून भीमेत १५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. तर वीजनिर्मितीसाठी १६०० चा विसर्ग सोडण्यात आलाय. उजनी धरण १११ टक्के भरले आहे.धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे थेट भीमा नदीत १६ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय.


वीर धरणातून नीरा नदीत १३ हजार ९११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे भीमा नदीत ३० हजार ५११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग येणार आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय . तर नदी पात्रात कुणीही न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरवात झाल्यास भीमा नदीला पुर येण्याची शक्यता आहे.