Home पंढरपूर पंढरपूरसह जिल्ह्यातील मायानिंग माफीयांना अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा दणका.

पंढरपूरसह जिल्ह्यातील मायानिंग माफीयांना अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा दणका.

350
0

पंढरपूर :- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस सह अनेक तालुक्यांत खडी क्रशर आणि मायनिंग सूरू आहे.यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तर दुसरीकडे पर्यावरणाची हानी होत आहे.
अशा विना परवाना खडी क्रशर आणि मायनिंग चालवणार्या तपास लावण्यासाठी विशेष भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात तपासणी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.
अपर जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्या नंतर ठोंबरे यांनी मायनिंग माफियांना दणका दिला आहे.
आज पर्यंत अनेक वेळा या विरूद्ध अनेक तक्रारी येत होत्या मात्र या विरोधात ठोस कारवाई होत नव्हती.मित्र ठोंबरे यांच्या दणक्याने मायनिंग माफियांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात खडी क्रशर आणि दगड खाणीतून दगड उत्खनन करण्यास परवानगी नसतानाही अनेक ठिकाणी हे उद्योग सुरू असल्याचे प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे.
पंढरपूर मंगळवेढा माळशिरस आणि सांगोला या ठिकाणी अनेक खडी क्रशर बंद करण्यात आले आहेत.
आता भरारी पथका द्वारे कारवाई होणार असल्याने मायनिंग माफियांच्या अडचणी वाढल्या आहेत.

जिल्ह्यातील खडी क्रशर आणि खाण मालकांनी परवाने नुतनीकरण करावे. ज्यांनी अद्याप परवाने घेतले नाहीत त्यांनी तातडीने घ्यावेत असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.