Home पंढरपूर गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी; कल्याणराव काळे यांची माजी केंद्रीय...

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी; कल्याणराव काळे यांची माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याकडे मागणी.

464
0

पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव‌‌ काळे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेवून केली आहे.
शनिवारी पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर का शेगाव मुंडेवाडी टाकळी यासह इतर अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने गारपीट झाली आहे यामध्ये द्राक्ष केळी पपई आंबा डाळिंब यासह गहू हरभरा मका कांदा या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना पुन्हा मदत करून उभा करणे आवश्यक आहे यासाठी शासन पातळीवरून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही श्री काळे यांनी आपल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
माझी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येतात. अशावेळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण प्रयत्न करावेत असे साखळी यावेळी त्यांना घातले आहे.
शरद पवार यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडेही प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याचे श्री काळे यांनी सांगितले.
अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर श्री काळे यांनी आज तातडीने बारामती येथे जाऊन शरद पवारांची भेट घेऊन मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.
अलीकडेच श्री काळे यांनी शेतकऱ्यांच्या वाढीव पाणी पट्टी संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेऊन मागणी केली होती त्यांच्या या मागणीला यश आल्यानंतर आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी थेट शरद पवारांची भेट घेऊन मागणी केली आहे काळे यांच्या मागणीनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक मोहन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.