Home पंढरपूर संत नामदेव महाराजांच्या वंशजांवरिल दाखल गुन्हे मागे घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन.

संत नामदेव महाराजांच्या वंशजांवरिल दाखल गुन्हे मागे घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन.

628
0

पंढरपूर: राज्यभर वारकरी संप्रदायाला भजन कीर्तनास परवानगी द्यावी, राज्यातील मंदिरे खुली करावीत आणि संत नामदेव महाराजांच्या वंशजावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेसह इतर संघटनांनी पंढरपूरमध्ये गुरुवारपासून सुरू केलेले आमरण उपोषण आज प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आले आहे. आमदार रोहित पवारांनी चर्चा केल्यानंतर वारकऱ्यांचे समाधान झाले.


प्रांताधिकारी सचिन ढोले व वारकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चा होऊन मागण्याचे निवेदन शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाद्वार काल्यादिवशी संत नामदेवांचे वंशज व मदन महाराज हरिदास यांचेवर दाखल केलेला गुन्हा देखील मागे घेण्यास प्रशासनाने तयारी दाखवल्यानंतर तोडगा निघाला. वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार होत नसल्याने व तात्काळ मागण्या मान्य होत नसल्याने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतून १ लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतील, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथमहाराज देशमुख यांनी दिला होता. या आंदोलनाला राज्यातील अनेक वारकरी संघटनांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही पाठिंबा दिला होता. त्यामुळे सरकार पातळीवरून वेगाने हालचाली होऊन, वारकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला व तूर्त पुढील आंदोलन टळलं आहे.