Home पंढरपूर विराज जगताप हत्या प्रकरणाचे पंढरीत पडसाद.

विराज जगताप हत्या प्रकरणाचे पंढरीत पडसाद.

2398
0

पंढरपूर :- विराज जगताप आणि अरविन्द बनसोडे यांच्या हत्येचे पडसात पंढरपूरात उमटले आहेत. आज आरपीआयच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवून दोन्ही प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


नागपूर मध्ये अरविंद बनसोडेची हत्या केल्याचा आरोप केला जातोय. यातील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी निगडित असल्याने त्यांचेवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप सामाजिक संघटनांच्या वतीने केला गेलाय.

तर पुणे जिल्ह्यातील पिपळे सौदागर येथे विराज जगताप या वीस वर्षीच्या युवकाची प्रेम संबधावरुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी सहा आरोपींवर कारवाई करण्यात आलीय.
या दोन्ही प्रकरणावरुन राज्यात असंतोष पसरला आहे. दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत.
आज पंढरपूरमध्ये आरपीआयच्या वतीने नागपूर आणि पुण्यातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी आरपीआयचे नेते आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, कुमार भोसले, संतोष पवार, अर्जुन मागाडे, सचिन भोसले, दयानंद बाबर, समाधान लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.